bjp meeting in delhi 
ताज्या बातम्या

दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक, उमेदवारांची यादी जाहीर होणार?

Published by : Team Lokshahi

दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित असणार आहेत. थोड्याच वेळात पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत राज्यातील उमेदवारांबाबत चर्चा होणार आहे.

दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, चंद्रकांत पाटील, विनोद तावडे, पियूष गोयल उपस्थित आहेत. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाच तिकीट वाटपावर चर्चा केल्याचं फडणवीस यांनी ट्वीट केलं आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह नुकतेच भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत. राज्यातल्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाच्या नेत्यांची बैठक भाजप मुख्यालयात होत आहे. राजनाथ सिंह तसेच काही वेळापूर्वी अमित शाह भाजप मुख्यालयात दाखल झाले आहेत.

Vanchit Bahujan Aaghadi कडून तिसरी यादी जाहीर

Sonalee Kulkarni: सोनाली कुलकर्णीचा ब्लॅक ड्रेस लूक पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

Breaking NEWS | New Justice Statue In Supreme Court | न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली...

Diwali 2024: दिवाळीत लक्ष्मीपूजनसाठी देवी समोर लावा पणतीपासून तयार केलेली सुंदर समई...

मोठी बातमी: न्याय देवतेच्या डोळ्यावरील काळी पट्टी काढली