राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वीकारला आहे. रमेश बैस यांची महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर तोफ डागली आहे.
भगव्याचा त्याग करून हिरवी वस्त्र परिधान करणाऱ्या नेत्यांना भगसिंग कोश्यारी खूपत होते. त्यांना दु:ख व्हायचं. त्यांचं दु:ख आणि व्यथा मी समजू शकतो.पण त्यांच्यामुळे चांगल्या व्यक्तीला राज्यपालपदावरून पायउतार व्हावं लागलं. भगतसिंग कोश्यांरी यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा असं किरीट सोमय्या म्हणाले.
दरम्यान, भगतसिंह कोश्यारी यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानावरून संपूर्ण राज्यात राज्यपाल हटाव मोहीम सुरू करण्यात आली होती. त्यावरून ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पत्र लिहून कार्यमुक्त होण्याची विनंती केली होती. त्यावरून भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरुन तात्काळ हटवा अशी मागणीही होऊ लागली होती.