Chandrashekhar Bawankule Lokshahi
ताज्या बातम्या

चंद्रशेखर बावनकुळेंचा ठाकरे गटावर हल्लाबोल, म्हणाले, "उद्धव ठाकरेंनी जीवनातील सर्वात मोठी चूक..."

Published by : Naresh Shende

Chandrashekhar Bawankule Press Conference : मी मुख्यमंत्री असताना चुकलो. सुप्रीम कोर्टात मराठा समाजाचा प्रश्न ऐरणीवर होता, तेव्हा मी न्याय देऊ शकलो नाही. ही उद्धव ठाकरेंनी केलेली जीवनातील सर्वात मोठी चूक आहे. त्यामुळे मराठा समाजाला रस्त्यावर यावं लागत आहे. मराठा समाजाच्या आंदोलनात भाजपचा पदाधिकारी आडवला होता, यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कोणताही पदाधिकारी कोणत्या पक्षाचा नसतो. भाजपचा असो किंवा काँग्रेसचा असो, मराठा समाजाच्या आंदोलनाला गेलेला प्रत्येक पदाधिकारी त्या समाजाचा प्रतिनिधी असतो. त्या आंदोलनात सर्वच पक्षाचे लोक आहेत. आपल्या समाजाला न्याय मिळण्यासाठी सर्वच समाजाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे. मग ते मराठा असो किंवा ओबीसी असो, असं म्हणत बावनकुळे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर भाष्य केलं.

नागपूर, संभाजीनगरसह राज्यात खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक संभाजीनगरमध्ये येत आहे. पण ही गुंतवणूक खरंच या राज्यातच येईल की बाहेरच्या राज्यात जाईल? या प्रश्नाचं उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, संभाजी नगरसाठी महत्त्वाचा एमओयू झाला. गुंतवणुकीसाठी उद्योजकांना जे काही पाठबळ देता येईल, ते दिलं पाहिजे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, २८८ मतदारसंघात निवडणूक लढवणार आहेत, यावर बोलताना बावनकुळे म्हणाले, या राज्यात लोकशाही, संविधानाप्रमाणे आपलं व्यक्तीस्वातंत्र्य आहे. तसच निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी निवडणूक लढावी, आम्ही त्यांना थांबवू शकत नाही. आम्ही यांचे उमेदवार पाडू, असंही ते म्हणाले होते. त्यावरही आम्ही काही बोललो नाही. शेवटी जनता निर्णय घेईल. मला असं वाटतं, लोकशाहीत सर्वांना हक्क आणि अधिकार असतो. त्यांना अधिकार आहे.

मनसेच्या भूमिकेवर बोलताना बावनकुळे म्हणाले, मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे, विकसीत भारताचा संकल्प पूर्ण व्हावा, यासाठी राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी मतं दिली आहेत. विधानसभेत त्यांनी वेगळी भूमिका व्यक्त केली आहे. लोकशाहीत प्रत्येकाला आपापला अधिकार आहे. मनसे भाजपसोबत नसल्यास विधानसभेत फटका बसेल का? या प्रश्नाचं उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, मी या गोष्टींचं भाकीत सांगू शकत नाही. महाविकास आघाडीचा खोटारडेपणा समोर आणला पाहिजे. जनतेला गोंधळाता टाकणाऱ्या महाविकास आघाडीने त्यांची माफी मागितली पाहिजे.

Raj Thackeray: 'एक देश एक निवडणूक' संकल्पनेला राज ठाकरे यांचा सवाल

Eid-E-Milad: आज मुस्लिम बांधवांनी वसई गावात ईद ए मिलादनिमित्त काढला भव्य जुलुस

Hina Khan: हिना खानचा देसी अंदाज पाहिलात का? पाहा "हे" फोटो...

अनन्या पांडे बे म्हणून पुन्हा माजवेल खळबळ, प्राइम व्हिडिओने अधिकृतपणे 'कॉल मी बे सीझन 2' ची केली घोषणा

Ganpati Visarjan 2024: गणपती बाप्पाच्या विसर्जनावेळी बाप्पाची पाठ घराकडे का नसावी? जाणून घ्या नेमके कारण काय?