Chandrashekhar Bawankule Press Conference: मोदी सरकारच्या योजना थांबवणे, हाच महाविकास आघाडीचा एकमेव अजेंडा आहे. मोदींच्या पुढच्या पाच वर्षातील सरकारचा एकही पैसा महाराष्ट्रात खर्च न होऊ देणे, ही भूमिका महाविकास आघाडीच्या नेत्यांची आहे. त्यांनी अनुमती दिली आहे. महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळं मराठा आरक्षण गेलं. ठाकरे सरकारच्या काळात मराठा आरक्षण गेलं. ओबीसीचं आरक्षणही गेलं होतं. पण शिंदे-फडणवीस सरकार आल्यावर मराठा-ओबीसी आरक्षणाचे निर्णय घेतले, असं मोठं विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केलं.
चंद्रशेखर बावनकुळे महाविकास आघाडीवर टीका करत म्हणाले, महाविकास आघाडी सत्तेत येणं म्हणजे लाडकी बहिण योजना बंद करणे. ते सत्तेत आल्यावर तीन सिलेंडर बंद करतील. तसच शेतकऱ्यांचं माफ केलेलं वीजबील बंद करण्याचं काम महाविकास आघाडी करेल. महाविकास आघाडीचं सरकार येणं म्हणजे जनतेचं रेशन बंद करणे. मोदी सरकारचं रेशन बंद करणे. एक रुपया पीक योजनाही ते बंद करतील. त्यांच सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे हाल होतील. महाराष्ट्रातील सर्व योजना बंद केल्याशिवाय ही महाविकास आघाडी राहणार नाही.
भारतीय जनता पक्षाचं ऐतिहासिक अधिवेशन उद्या दहा वाजता सुरु होणार आहे. ५ हजार ३०० प्रतिनिधी या अधिवेशनाला येणार आहेत. मोदी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे सरकारने मोदींच्या सर्व योजना बंद पाडण्याचं पाप केलं होतं. मोदींचं सरकार काम करत होतं. पण ठाकरे सरकारमुळं राज्याचं काय नुकसान झालं आहे, हे सुद्धा अधिवेशनात मांडणार आहोत. पुढच्या काळात महाविकास आघाडीला दिलेलं एक चुकीचं मत महाराष्ट्राच्या १४ कोटी जनतेचं किती नुकसान करेल, याबाबत आम्ही मतदारांना समजवणार आहोत, असंही बावनकुळे म्हणाले.