Ujjwal Nikam On Pooja Khedkar: पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या प्रशिक्षणार्थी आएएस पूज खेडकर यांच्या वादग्रस्त प्रकरणात नवनवीन माहिती समोर येत आहे. खेडकर कुटुंबियांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारल्यानंतर अनके तर्क वितर्कांना उधाण आलं आहे. अशातच विशेष सरकारी वकील आणि भाजप प्रवक्ते उज्ज्वल निकम यांनी माध्यमांशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिलीय.
काय म्हणाले उज्ज्वल निकम?
या प्रकरणाची उच्चस्तरीय पातळीवर चौकशी सुरु आहे. परंतु, एक गोष्ट मात्र निश्चित आहे की या प्रकरणामुळे यूपीएससीने ज्या परीक्षा घेतल्या होत्या, त्याविषयी लोकांच्या मनात एक शंका उपस्थित झालेली आहे. सरकारला निश्चितपने याचं निराकरण करावं लागेल. कारण विशेषतः दिव्यांग्याचं खोटं प्रमाणपत्र घेतलं असेल आणि अशा खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे ही परीक्षा पास होऊन सवलतींच्या माध्यमातून काही नियुक्त्या केल्या असतील, तर त्याची चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
हे प्रकरण गंभीर असून ज्या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून चांगले गुण मिळवलेले आहेत, त्यांच्याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र यूपीएससीने याबाबतीत पारदर्शकपणे तातडीने चौकशी करून कायदेशीर निकाल देणे अपेक्षित आहे, असंही उज्ज्वल निकम म्हणाले.