ताज्या बातम्या

भाजपनं फोटो शेअर करत केले आरोप; हमीद अन्सारी म्हणाले, मी...

हमीद अन्सारी यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Published by : Sudhir Kakde

पाकिस्तानी पत्रकाराला भारताची गुप्त माहिती पुरवल्याच्या वादावर माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच त्यांनी भाजपचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांना यापूर्वी कधीही ओळखत नसल्याच्या त्यांच्या विधानावर मी ठाम असल्याचं हमीद अन्सारी यांनी सांगितलं. तसंच त्यांनी आपण त्या पत्रकाराला कोणत्याही परिषदेला आमंत्रित केलं नाही असं सांगितलं. दुसरीकडे, भाजपने पाक पत्रकार नुसरत मिर्झा यांचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्याशी संबंध असल्याचा दावा करणारा फोटो जारी केला आहे.

पाकिस्तानी पत्रकार नुसरत मिर्झा यांनी दावा केला होता की, यूपीए सरकारच्या काळात त्यांनी पाच वेळा भारताला भेट दिली होती. इथे त्यांनी गोळा केलेली संवेदनशील माहिती त्यांनी आपल्या देशाच्या गुप्तचर संस्था आयएसआयला दिली होती. यानंतर हमीद अन्सारी यांच्यावरुन भारतात एका नवा वाद निर्माण झाला आहे. त्यानंतर आता हमीद अन्सारींनी यावरुन स्पष्टीकरण दिलं आहे. तत्पूर्वी, नुसरत मिर्झाला निमंत्रित केल्याच्या भाजपच्या दाव्याचं खंडन करताना अन्सारी म्हणाले होते की, हे सत्य सर्वज्ञात आहे की, भारताचे उपराष्ट्रपती सरकारच्या सल्ल्यानेच परदेशी मान्यवरांना निमंत्रण देतात. तेही सहसा परराष्ट्र मंत्रालयामार्फत हे निमंत्रण दिलं जातं.

दरम्यान, शुक्रवारी भाजपने हा फोटो प्रसिद्ध केल्यानंतर अन्सारी यांनी याप्रकरणी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. हमीद अन्सारी यांनी पाकिस्तानी पत्रकाराचे आरोप पूर्णपणे खोटे असल्याचं म्हणत ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. या पत्रकाराला आपण ओळखत नव्हतो, तसंच त्याला कधी आपण फोनही केला नसल्याचं हमीद अन्सारी यांनी सांगितलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का