Vinayak Raut Google
ताज्या बातम्या

Vinayak Raut: विनायक राऊतांचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले; "भाजपच्या माध्यमातून मुंबई संपवण्याचा..."

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यानंतर माजी खासदार विनायक राऊत यांनीही भाजपला धारेवर धरलं. ते म्हणाले...

Published by : Naresh Shende

Vinayak Raut On BJP : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. राजकारणात एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहील. सर्व सहन करून मी जिद्दीने उभा राहिलोय. समोरचा शत्रू कितीही मोठा असला तरी हर हर महादेव म्हणत तुटून पडायचं. इथे प्रचाराला याच, उरली सुरलेली गुरमी उतरवतो, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलं होतं. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार विनायक राऊत यांनीही भाजपवर हल्लाबोल केला आहे. भाजपच्या माध्यमातून मुंबई संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मुंबई उध्वस्त करण्याचा कपटकारस्थान सुरू आहे, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे.

विनायक राऊत माध्यमांशी बोलताना काय म्हणाले?

आजच्या मुंबईतील शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अपेक्षित मार्गदर्शन केलं आहे. खास करून भाजपच्या माध्यमातून मुंबई संपवण्याचा कार्यक्रम सुरू आहे. मुंबई उध्वस्त करण्याचा कपटकारस्थान सुरू आहे. याच्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी कठोर शब्दात भाषण केलं आहे. अदानींच्या घशात संपूर्ण मुंबई घालण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भाजपात तोंड बंद करून बसले आहेत. मुंबईत मराठी माणसाचं अस्तित्व संपवायचं आहे, हे यावरुन स्पष्ट होतं. धारावीत जवळपास एक लाखाच्या आसपास निवासी आणि अनिवासी लोक राहतात. उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते, त्यावेळी त्यांनी निर्णय घेतला होता की, धारावीकरांना व्यवसायासहित जागा दिली पाहिजे.

पण ज्यावेळी फडणवीस यांच्या हातात धारावीचं टेंडर आलं, तेव्हा त्यांनी धारावीकरांना त्या ठिकाणी जागा न देता संपूर्ण मुंबईला उध्वस्त करून टाकायचं, अशी भूमिका त्यांनी घेतली. तसच अदानीला जवळपास २ हजार एकर जमीन धारावीच्या नावाखाली देत आहेत. अदानीच्या घशात सर्व सरकारी जागा घालायचा प्रयत्न सुरू आहे. धारावीमध्ये अदानीचं बस्थान बसवायचं, अशाप्रकारे कपटनीती सुरू आहे.

धारावीकरांच्या पाठीशी उभे राहत असताना मुंबईत रक्षक समिती स्थापन करा, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ज्या पद्धतीने फडणवीस यांचे कपटकारस्थान समोर आणलं, त्यात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कशाप्रकारे अडकवायचं, याचं सत्य देशमुखांनी समोर आणलं. जे जे महाराष्ट्रविरोधी आहेत, त्यांच्या विरोधात उभे राहावेच लागेल, असा निर्वाणीचा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीचा शपथविधी 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणार

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव

Amit Thackeray : माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे यांचा पराभव; पोस्ट शेअर करत म्हणाले...