ताज्या बातम्या

BJP उद्धव ठाकरेंप्रमाणे आपल्यालाही धक्का देईल म्हणून नितीश कुमारांनी सुरु केल्या हालचाली

बिहारमध्ये सध्या नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड आणि भाजपचं सरकार असून, हे सरकार पडण्याची चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत.

Published by : Sudhir Kakde

बिहारमधील सत्ताधारी पक्ष असलेला जनता दल युनायटेड (JDU) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यातील वाद आता तीव्र झाला असल्याचं दिसतंय. या वादाचं कारण म्हणजे प्रादेशिक पक्षांना डावलण्याची भाजपची भूमिका नितीश कुमार यांच्या भीतीचं सर्वात मोठं कारण असल्याची शक्यता आहे. भाजप येणाऱ्या काळात आपल्याला दुय्यम स्थान देईल ही भीती नितीश कुमार यांच्या मनात वाढताना दिसतेय. नितीश कुमार यांच्या निकटवर्तीयांनी दिलेल्या महितीमुळे ही शक्यता अधिक बळावली आहे. बिहारमध्ये सुद्धा महाराष्ट्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आणि जसं उद्धव ठाकरेंना डावललं तसं आपल्यालाही डावललं गेलं तर काय? ही चिंता नितीश कुमारांना सतावत असल्याचं दिसतंय. त्यामुळे काल त्यांच्या एका सहकार्‍यानं जाहीर वक्तव्य करून भाजप आमचा पक्ष फोडण्याचं काम करत असल्याचा आरोप केला आहे.

उद्धव ठाकरेंप्रमाणेच नितीश कुमार सुद्धा बिहारचे प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत. एकीकडे भाजपसोबत सत्तेत असताना देखील नितीश कुमारांसमोर आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्याचं देखील आव्हान आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं भाजपने उद्धव ठाकरे यांना धक्का दिला आणि शिवसेनेची पडझड झाली. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेप्रमाणे नितीश कुमारांच्या जेडीयु पक्षाचे देखील भाजपशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे आता ज्याप्रमाणे राज्यात शिवसेनेने राष्ट्रवादी या प्रादेशिक पक्षाशी आघाडी केली होती, तशीच आघाडी नितीश कुमारांना बिहारच्या प्रादेशिक पक्षाशी करायची आहे. फरक फक्त एवढाच आहे की, 2019 साली ज्या पद्धतीनं शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी आघाडी करत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती, तशीच नितीश कुमार यांनी प्रादेशिक पक्षांशी आघाडी करत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. तर आता जी परिस्थिती बिहारमध्ये उद्भवू शकते ती, परिस्थिती महाराष्ट्रात 2019 सालीच होऊन गेली आहे. जी भावना उद्धव ठाकरेंच्या मनात 2019 साली आली होती, तीच भावना नितीश कुमारांच्या मनात आली आहे.

दरम्यान, नितीश कुमार यांना मागच्या काही काळात घडलेल्या घटनांमुळे असं वाटतंय की, भाजपकडून त्यांच्या जवळच्या लोकांनाच त्यांच्या विरोधात उभं राहण्यासाठी बळ मिळतंय. भाजपच्या रणनीतीचा आपण बळी ठरत असल्याचं नितीश यांना वाटतंय. जवळच्यांना विरोधात उभं करणाऱ्या या कथित षडयंत्राला अमित शहांचा पाठिंबा आहे, असंही त्यांना वाटतंय.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news