ताज्या बातम्या

Pooja Khedkar Case Updates: पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट! UPSCचे सर्व आरोप फेटाळले

पूजा खेडकरने यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे.

Published by : Dhanshree Shintre

पूजा खेडकरने यूपीएससीचे सर्व आरोप फेटाळले आहेत. यूपीएससीच्या आरोपात तथ्य नसल्याचे पूजा खेडकरचे म्हणणे आहे. पूजा खेडकरने नाव बदलून फसवणूक केल्याचा आरोप यूपीएससीने केला होता. पण नाव बदलल्याची माहिती आपण आधीच यूपीएससीकडे दिली असल्याचे पूजा खेडकरने स्पष्टीकरण दिले आहे.

पूजा खेडकर प्रकरणी आता उद्या पुन्हा दिल्ली हायकोर्टात सुनावणी होणार आहे. पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळणार की फेटाळला जाणार यावर उद्या निर्णय होणार आहे. पूजा खेडकरच्या अडचणी अजून संपलेल्या नाहीत. याआधीच यूपीएससीने त्यांची उमेदवारी रद्द केली आहे. पूजा खेडकर यांना पुन्हा परीक्षेला बसता येणार नसल्याचे देखील यूपीएससीने म्हटले होते. पूजा खेडकर प्रकरण अनेक दिवसांपासून देशभरात चर्चेत आलं होतं.

पूजा खेडकर यांच्या विरोधात यूपीएससीने गुन्हा दाखल केला होता. अटक होऊ नये म्हणून आधीच पूजा खेडकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता. सरकारी वकिलांनी अटकपूर्व जामीन देण्यास विरोध केलाय. पूजा खेडकरला जामीन मिळाल्यास चौकशीत त्या सहकार्य करणार अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती