राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
यातच 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर आता आणखी एक माहिती समोर येत आहे ती म्हणजे आरोपींनी अभिनेता सलमान खानच्या घराचीही रेकी केली असल्याची माहिती मिळत आहे. आरोपी गुरूनेल सिंहने गेल्या महिन्यात सलमानच्या घराची रेकी केली होती.
आरोपींना येणारी सर्व महिती ही 'स्नॅप चार्ट' या अॅपद्वारे येत असून आलेले मेसेज वाचून आरोपी ते मेसेज डिलिट मारायचे तसेच या आरोपींना घरासाठी बनवण्यात आलेले आधारकार्डही स्नॅपचार्टवर पाठवण्यात आले असून या बनावट आधारकार्डचा स्क्रीन शॉर्ट काढून ते डिलिट करण्याच्या सूचना होत्या अशी कबूली आरोपींनी दिली असल्याची माहिती दिली होती.