वाढत्या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. याच पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने या संदर्भात एक योजना केली आहे. आता महागाईचा दर सात टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. त्याचवेळी सिलिंडर स्वस्त होण्याची शक्यता आहे. खाद्यपदार्थांच्या किंमती वाढल्यामुळे किरकोळ महागाई दरात ऑगस्टमध्ये वाढ झाल्याचं सांगितलं जातंय. ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाई दरात झालेल्या वाढासाठी प्रामुख्याने खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये झालेली वाढ जबाबदार मानली जात आहे. किरकोळ महागाई दर 6.71 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर गेलाय.
किरकोळ चलनवाढीचा दर जुलैमध्ये 6.71 टक्क्यांवरून ऑगस्टमध्ये 7 टक्क्यांवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईपासून जनतेला दिलासा देण्यासाठी सरकारने नवीन योजना तयार केली आहे. तेल कंपन्या गॅस सिलिंडर आणि पेट्रोलचे नुकसान करत नसल्याची माहिती अलीकडेच एका अहवालातून समोर आली आहे.
तेल मंत्रालयाने 28,000 कोटी रुपयांची मागणी केली आहे, तेल मंत्रालयाने कंपन्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी 28000 कोटी रुपयांची भरपाई मागितली आहे. पण, अर्थ मंत्रालय 20,000 कोटी रुपयांचे रोख पेआउट करण्याच्या बाजूने आहे. याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. तीन मोठे सरकारी इंधन किरकोळ विक्रेते एकत्रितपणे देशातील 90 टक्क्यांहून अधिक पेट्रोलियम इंधनाचा पुरवठा करतात. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत गेल्या 7 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आहे. सरकार इंडियन ऑइल कॉर्पोरेशन सारख्या सरकारी इंधन किरकोळ विक्रेत्यांना 20,000 कोटी रुपये देण्याचा विचार करत आहे . यासह इंधन विक्रेत्यांचे होणारे नुकसान भरुन काढण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे आगामी काळात घरगुती गॅस सिलिंडरच्या किमती कमी होऊ शकतात. सध्या LPG सिलिंडर 1053 रुपयांच्या उच्चांकावर आहे.