रशियामध्ये मोठा भूकंप झाला आहे. 7.0 रिस्टर स्केलचा भूकंप झाला. भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. ज्वालामुखीचा उद्रेकातून लावा मोठ्या प्रमाणात बाहेर पडत आहेत. 8 किलो मीटर उंच पसरली राख हवेत पसरली आहे. भूकंपामुळे कोणतेही "मोठे नुकसान" झाले नाही. मात्र, आता या भूकंपामुळे नवे संकट उभे राहिले आहे, आता त्सुनामीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या भूकंपामुळे काही घरांमघील फर्निचर तुटली आणि भांडी खाली पडल्याची माहिती समोर आली आहे. रशियन अकादमी ऑफ सायन्सेसच्या जिओफिजिकल सर्व्हिसच्या कामचटका शाखेने दिलेल्या माहितीनुसार स्थानिक वेळेनुसार शनिवारी 7:21 वाजता हा भूकंप झाला. या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
या भूकंपाच्या केंद्रापासून 300 किलोमीटरपर्यंत त्सुनामीचा धोका असल्याचे या इशाऱ्यात म्हटले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा असं प्रशासनाने म्हटले आहे.