ताज्या बातम्या

बाबा सिद्दिकींच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांचा मोठा खुलासा

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

यातच 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता बाबा सिद्दिकींच्या सुरक्षेबाबत मुंबई पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. बाबा सिद्दिकींना वाय दर्जाची सुरक्षा नसल्याची पोलिसांनी माहिती दिली आहे. बाबा सिद्दिकींना तीन पोलिसांची सुरक्षा देण्यात आली होती.

मात्र गोळीबाराच्यावेळी बाबा सिद्दिकींसोबत एकच पोलीस होता अशी माहिती मिळत असून घटनास्थळावरुन दोन आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींचा रेकॉर्ड तपासण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने पत्रकार परिषदेत याबाबत मोठा खुलासा केला.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठी घोषणा; मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी

कोल्हापुरात केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

विधानसभेसाठी शिवसेनेचा पहिला उमेदवार जाहीर; आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; वैद्यकीय चाचणीतून आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न

परळीच्या वैद्यनाथ मंदिराची तोडफोड; माजी नगराध्यक्षाकडून मंदिराच्या शिखराची तोडफोड