ताज्या बातम्या

Kangana Ranaut : खासदार होताच कंगनाची मोठी मागणी!

लोकसभेच्या नवनियुक्त खासदार व अभिनेत्री कंगना राणावत यांची सोमवारी महाराष्ट्र सदनातील भेट वादात सापडली.

Published by : Dhanshree Shintre

लोकसभेच्या नवनियुक्त खासदार व अभिनेत्री कंगना राणावत यांची सोमवारी महाराष्ट्र सदनातील भेट वादात सापडली. तात्पुरत्या निवासासाठी खोल्यांची पाहणी करण्यासाठी राणावत सदनात आल्या होत्या. पण तिथे त्यांनी मुख्यमंत्री कक्षाची मागणी केल्याची चर्चा रंगली. त्यावर शिवसेना-ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत व काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी ट्वीट करून राणावत यांच्यावर टीका केल्याने नवा वाद निर्माण झाला.

मात्र, राणावत यांनी मुख्यमंत्री कक्षाची निवासासाठी कोणतीही मागणी केलेली नव्हती. सदनामध्ये येऊन राणावत यांनी खोल्यांची पाहणी केली. त्यांना पसंत असेल तर त्या सदनात राहू शकतात, असे सदनाच्या सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार (राजशिष्टाचार व सुरक्षा) यांनी स्पष्ट केले.

यंदा लोकसभेमध्ये नव्या खासदारांची संख्या जास्त असल्याने त्यांना कायमस्वरूपी निवास उपलब्ध होईपर्यंत विविध राज्यांच्या सदन व भवनांमध्ये रहावे लागणार आहे. दिल्लीमध्ये महाराष्ट्र सदनामध्ये निवासाची उत्तम सुविधा असल्याने इतर राज्यांतील खासदारही इथे राहण्यास उत्सुक असतात. राणावत हिमाचल प्रदेशातील मंडीच्या खासदार असल्या तरी तिथे योग्य सुविधेचा अभाव असल्याने त्यांनी महाराष्ट्र सदनात राहण्याच्या दृष्टीने सोमवारी सदनाला भेट देऊन पाहणी केली.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश