ताज्या बातम्या

Mumbai High Court: मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन

मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन 23 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

मुंबई हायकोर्टाच्या नव्या इमारतीचं सोमवारी भूमीपूजन 23 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे. मुंबईच्या बांद्रा पूर्व बीकेसीत भूमीपूजन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंही या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व इतर अनेक विशेष अतिथी, मान्यवर हजर राहणार आहेत. विशेष कार्यक्रम असल्याने मुंबई पोलिसांनी वाहतुक व्यवस्थेत बदल केला.

उच्च न्यायालयाच्या नवीन वास्तूसाठी 2012 मध्ये ज्येष्ठ वकील अहमद अब्दी यांनी जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर 22 जानेवारी 2019 रोजी उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती अभय ओक व न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या खंडपीठाने सहा महिन्यांत जागा उपलब्ध करण्याचे आदेश सरकारला दिले होते. न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने जागा दिली नाही म्हणून मार्च 2022 मध्ये अ‍ॅड. अब्दी आणि अ‍ॅड. एकनाथ ढोकळे यांनी सरकारविरोधात अवमान याचिका दाखल केली.

मिंधे सरकारने अवमान याचिकेवरील सुनावणीत चालढकल केली. प्रत्येकवेळी केवळ हमी देत मिंधे सरकारने वेळ मारून नेली. जुलैमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मिंधे सरकारला वांद्रेतील 4.39 एकरची जागा देण्यासाठी सप्टेंबरची डेडलाइन दिली होती. त्यानंतर सरकारी यंत्रणा कामाला लागली.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी