भंडाऱ्याच्या सोनी हत्याकांडातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुमसर येथील सोने-चांदी आणि हिऱ्याचे व्यापारी संजय सोनी, त्यांची पत्नी पूनम आणि बारा वर्षीय मुलगा धृमील यांची निर्घृणपणे हत्या करून घरातील तिजोरीतील सुमारे पाच कोटींच्या दागिन्यांसह आरोपी पसार झाला. भंडाऱ्याच्या तुमसर तालुक्यात 2014 मध्ये झालेल्या सोनी हत्याकांडाचा अखेर 9 वर्षांनंतर निकाल लागला.
26 फेब्रुवारी 2024 ला संजय सोनी हे त्यांच्या चालकासह वाहनाने गोंदिया येथे सोने आणि चांदी खरेदी आणि विक्रीसाठी गेले होते. तिथून परत येत असताना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील बिरसी फाट्यावर चालकाने संजय सोनी यांचा नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून हत्या केली. त्यानंतर वाहनामध्ये मृतदेह टाकून चालक घरी पोहोचला. त्यावेळी मध्यरात्रीच्या सुमारास चालकाने सुनी यांची पत्नी पूनम आणि मुलगा धृमील यांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करून दागिने पळविले होते. सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.जी.अस्मर यांच्याकडून निकाल जाहीर करण्यात आला.
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सरकारी पक्षाकडून युक्तिवाद केला. विश्वासू चालकानेच सोनी कुटुंबाचा घात केल्याचं सिद्ध झालं. या प्रकरणी 275 पानांचं निकालपत्र तयार करण्यात आलं