पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagvant Mann) दुसऱ्यांदा लग्न करणार आहेत. गुरुवार, 7 जुलै रोजी चंदीगडमध्ये एका खाजगी समारंभात डॉ.गुरप्रीत कौर यांच्याशी लग्न करणार आहे. या कार्यक्रमाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद (CM Arvind Kejriwal) केजरीवालही उपस्थित राहणार आहेत. चंदिगडमध्ये भगवंत मान यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. या लग्नासाठी त्यांनी फक्त काही नातेवाईक आणि जवळच्या मित्रांनाच आमंत्रित केलं आहे. भगवंत मान यांचा पहिल्या पत्नीपासून ६ वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता. पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुलं देखील झाले आहेत. ही मुलं सध्या आपल्या आईसोबत अमेरिकेत राहतात. पंजाबच्या आम आदमी पार्टीचे प्रभारी राघव चड्ढा यांच्याकडे लग्नाच्या तयारीची जबाबदारी आहे.
आम आदमी पक्षाचे दिग्गज नेते या लग्नासाठी उपस्थित राहणार आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियाही यावेळी उपस्थित राहणार आहेत. पंजाबी मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार, भगवंत मान आणि गुरप्रीत, हे दोघे एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखत आहेत. भगवंत मान शीख रितीरिवाजानुसार लग्न करणार आहेत. त्यांची होणारी पत्नीही शीख समुदायातून असून, त्या मूळ पंजाबच्याच आहेत. भगवंत मान यांची पहिली पत्नी इंद्रप्रीत कौर या होत्या. काही कारणांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला होता.
काव्यात्मक शैलीत केली होती पहिल्या पत्नीपासून घटस्फोटाची घोषणा
भगवंत मान हे राजकारणात येण्यापूर्वी स्टँड अप कॉमेडी क्षेत्रात होते. त्याची प्रचिती त्यांच्या भाषणातून देखील येत असते. आपल्या पत्नीपासून घटस्पोट घेताना त्यांनी त्यांनी एक कविताही पोस्ट केली होती. 'जो लटकेयां सी चिरा तो ओ हल हो गया, कोर्ट छ एह फैसला कल हो गया... एक पासे सी परिवार, दुजे पास सी परिवार... मैं तो यारण पंजाब दे वाल हो गया' याचा अर्थ दीर्घकाळ प्रलंबित असलेला प्रश्न निकाली निघाला आहे. न्यायालयाने काल निर्णय दिला आहे. मला एक कुटुंब निवडायचं होतं. मी पंजाबसोबत निवडलं.