ईशान्य दिल्लीत काँग्रेस उमेदवार कन्हैया कुमार यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ही मारहाणीची घटना घडली आहे. ईशान्य दिल्लीत कार्यकर्त्याकडून मारहाण करण्यात आली आहे.
कन्हैया कुमार यांना पुष्पहार घालण्याच्या बहाण्याने आलेल्या दक्ष चौधरी या आरोपीने कन्हैया कुमार यांना कानाखाली मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना ईशान्य दिल्लीतील उस्मानपूर पोलीस स्टेशन परिसरातील करतार नगरमध्ये घडली. त्यानंतर स्थानिक कार्यकर्तांनी आरोपीला मारहाण केली.
याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, काँग्रेस उमेदवार कन्हैय्याकुमार यांच्यावर दिल्लीत झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध. हा हल्ला म्हणजे पराभूत मानसिकतेतून विरोधक सैरभैर झाल्याचं लक्षण आहे. आता कितीही हल्ले केले तरी दिल्लीत काँग्रेस आणि आप यांना विजयापासून कुणीही रोखू शकत नाही. असे रोहित पवार म्हणाले.