Police Commissioner | Ganesha mandal team lokshahi
ताज्या बातम्या

गणेश मंडळांची पिळवणूक कराल तर खबरदार; पोलिस आयुक्तांची तंबी

गणेश मंडळांची पिळवणूक कराल तर खबरदार; पोलिस आयुक्तांची तंबी

Published by : Shubham Tate

कल्याण (अमजद खान) - गणेश उत्सवादरम्यान गणेश मंडळ मंडपात लावले जाणारे फायर एक्स्टिंग्यूशर वाढीव किमतीत विकत असल्याच्या तक्रारी गणेश मंडळांनी पोलिसांकडे केल्या होत्या. याबाबत आज झालेल्या बैठकीत अप्पर आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी अशा काही तक्रारी असतील तर त्या कराव्यात वाढीव किमतीत फायर एक्स्टिंग्यूशर विकणाऱ्या संबंधित दुकानदारांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. (Be careful if you use Ganesha mandals; Police Commissioner)

गणेशोत्सव काही दिवसांवर येवून ठेपला आहे. दोन वर्षानंतर यंदा निर्बंध मुक्त गणेशोत्सव साजरा करता येणार असल्याने गणेश मंडळामध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. गणेश उत्सव साजरा करण्यासाठी परवानग्या, विविध सजावटी वस्तूंची खरेदी, मूर्तीची लगबग सुरू झाली आहे.

गणेशोत्सव उत्साहात साजरा करत असताना कायदा सुवस्था राखण्यासाठी शहरात पोलिस यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे. गणेश मंडळ, पोलिसांच्या बैठका सुरू आहेत. बैठकांमध्ये गणेशोत्सवादरम्यान गणेश मंडळांना भेडसावणाऱ्या समस्यां जाणून घेण्यासह मंडळांना सुचनांचे, सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन पोलिस यंत्रणेकडून करण्यात येत आहे. आज झालेल्या बैठकीत गणेश मंडळांकडून मंडपात सुरक्षेच्या दृष्टीकोनातून फायर एक्स्टिंग्यूशर बंधनकारक आहे.

मात्र, ऐन गणेशोत्सव काळात काही दुकानदारांकडून फायर एक्स्टिंग्यूशरच्या किमतीत वाढ करण्यात येते तर काही मंडळ फायर एक्स्टिंग्यूशर भाड्याने घेतात. त्या भाड्यात ही वाढ करत मंडळांची अडवणूक केली जात असल्याच्या तक्रारी केल्या. याबाबत अप्पर पोलिस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी गंभीर दखल घेत गणेशोत्सव दरम्यान, सबंधित दुकानदारांनी फायर एक्स्टिंग्यूशर त्याच किमतीत विकावे जाणीवपूर्वक जर वाढीव किमतीत विकाल तर त्याची तक्रार करा, त्या दुकानदारावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. या बैठकीत अनेक गणेश मंडळाचे पदाधिकारी पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका