ताज्या बातम्या

बारसू रिफायनरी प्रकल्पसाठी कोयना अवजल वापरणार

बारसू रिफायनरी प्रकल्पसाठी कोयना अवजल वापरणार

Published by : Siddhi Naringrekar

निसार शेख, चिपळूण

तब्बल १० अब्ज डॉलर्स गुंतवणुकीचा कोकणातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आता पाकिस्तानात जाणार असून सौदी अराम्कोने या तेल कंपनीने त्यासाठी ग्वादर शहराची निवड केल्याची बातमी एका दैनिकाने दिली आहे. त्यावरून भाजपचे आमदार तथा पक्षाचे मुंबई अध्यक्ष अॅड. आशिष शेलार यांनी ठाकरे गटाच्या नेत्यावर हल्लाबोल केला आहे. 'उबाठा'ने या 'रिफायनरी'ला विरोध करुन सरळ सरळ पाकिस्तानला मदत केली? असा सवालच त्यांनी केला आहे.

आमदार शेलार यांनी याबाबत थेट शिवसेनेच्या ठाकरे गटाला जबाबदार धरले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कोकणात रिफायनरी प्रकल्प ग्रीन प्रोजेक्टच होता. तो प्रकल्प आता पाकिस्तानकडे जात आहे, अशा बातम्या येत आहेत. या प्रकल्पाच्या विरोधात आकांडतांडव करणारे ठाकरे गटाच्या नेत्यांना यातून काय मिळाले, याचे उत्तर देतील का. या प्रकल्पातून हजारो लोकांना रोजगार मिळणार होता. आता हा प्रकल्प पाकिस्तानकडे गेला तर काय मिळाले, असा सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.

त्यानंतर रिफायनरी बाबत एक मोठी घडामोड समोर येत आहे बारसू रिफायनरी प्रकल्प यासाठी कोयनेचे अवजलचे पाणी वापरले जाणार आहे त्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून जीओ इन्फो कंपनीकडून सर्वेक्षण सुरू आहे 1 कोटी 90 लाख रुपये खर्च सर्वेक्षणसाठी करण्यात येणार आहे तर आतापर्यंत 140 किलो मिटर सर्वेक्षण पूर्ण झाले आहे चिपळूण ,संगमेश्वर,रत्नागिरी, लांजा आणि राजापूर अशा तालुक्यातून 160 किलो मीटर पेकी 90 टक्के पाईप लाईन जाणार आहे त्यामुळे कोकणात ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार हे जवळपास निश्चित झाले आहे .

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी