कोकणातल्या बारसू रिफायनरीच्या सर्वेक्षणाविरोधातील आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या आंदोलक ग्रामस्थांची भेट घेण्यासाठी आलेल्या ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुंबईवरुन राऊत हे बारसूकडे रवाना होताना पोलिसांनी त्यांना तेथे न जाण्यास सांगितले होते, मात्र विनायक राऊत हे आपल्या भूमिकेवर ठाम होते. यावेळी सुरुवातीला पोलिसांनी विनायक राऊत यांचा ताफा अडवला. त्यानंतर विनायक राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. आंदोलन ठिकाणी पोहचलेल्या विनायक राऊतांना नंतर पोलिसांनी ताब्यात घेतले.