दिवाळीचा सण सुरु झालाय. धनत्रयोदशीपासून दिवाळीला सुरुवात होते. या पार्श्वभूमीवर बँका बंद राहणार आहे. आरबीआयच्या सुट्ट्यांच्या कॅलेंडरनुसार, शुक्रवारपासून सलग सहा दिवस बँका बंद असणार आहेत.
धनत्रयोदशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मी पूजन, भाऊबीजची सुट्टी आहेच मात्र यासोबतच दुसऱ्या शनिवारी आणि रविवारी बँकांची नियमित सुट्टी असतेच.
दिवाळी आणि धनत्रयोदशीसाठी, राज्यातील बँका सहा दिवस बंद राहतील. यामध्ये रविवार आणि दुसरा शनिवार याचाही समावेश आहे.