ताज्या बातम्या

Lending Rates Hike : एचडीएफसीनंतर या सरकारी बँकेने वाढवले कर्जाचे दर

एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.1 टक्का वाढ झाली आहे.

Published by : Team Lokshahi

Bank Of Baroda Lending Rates Hike : भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेटमध्ये वाढ करताच एचडीएफसी बँकनेही कर्जाचे दर वाढवले. त्यानंतर आणखी एका सरकारी बँकेने व्याजाचे दर वाढवले आहे. यामुळे आता सर्वच कर्ज महाग होणार आहे. बँक ऑफ बडोदा (BoB) ने रेपो दर (Repo Rate)वाढवला आहे. यामुळे या बँकेची कर्ज 0.1 टक्के वाढली आहे. बँक ऑफ बडोदा (BoB)कडून शेअर बाजारास याची सूचना दिली आहे. एमसीएलआर (MCLR) मध्ये 0.1 टक्का वाढ झाली आहे.

बँकेने वाढलेले व्याजदर १२ मेपासून लागू होतील. बँक ऑफ बडोदाने एक वर्षाचा MCLR बदलून 7.40 टक्के केला आहे, तो आतापर्यंत 7.35 टक्के होता. बँकेचे बहुतांश ग्राहक या कर्जाच्या श्रेणीत येतात. याशिवाय, तीन महिने आणि सहा महिन्यांसाठी MCLR अनुक्रमे 7.15 टक्के आणि 7.25 टक्के करण्यात आला आहे. यासह, एक दिवस आणि एक महिन्याच्या MCLR आधारित कर्जासाठी इंटरनेट दर 0.10 टक्क्यांनी वाढवून 6.60 टक्के आणि 7.05 टक्के करण्यात आला आहे.

या बँकांनी वाढवले व्याजदर

RBI ने 4 मे रोजी रेपो दरात 0.40 टक्क्यांनी वाढ केल्यानंतर बँक ऑफ बडोदाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी, इंडियन ओव्हरसीज बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, करूर वैश्य बँक इत्यादींनी देखील त्यांचे MCLR आणि रेपो दराशी संबंधित व्याजदर सुधारित केले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेनेही आपला बाह्य बेंचमार्क लिंक्ड लेंडिंग रेट बदलला आहे. बँकेकडून सांगण्यात आले की कर्जाचा दर 7.25 टक्के करण्यात आला आहे. नवे दर 10 मे पासून लागू झाले आहेत. "आमच्या बँकेने रेपो लिंक्ड लेंडिंग रेट (RLLR) 7.25 टक्के (4.40 टक्के +2.85 टक्के) सुधारित केला आहे," IOB ने एक्सचेंज फाइलिंगमध्ये म्हटले आहे.

आता 4.4 टक्के रेपोरेट

गेल्या अनेक दिवसांपासून रेपो दर 4 टक्के होता. त्यात आता वाढ होत आहे. बुधवारी आरबीआयने रेपो रेट 0.40 टक्क्यांवरून वाढून 4.4 टक्के झालाय. रेपो रेट-सीआरआर वाढविण्याचा निर्णय आरबीआयचे गव्हर्नर शशिकांत दास यांनी जाहीर केला. या निर्णयाचा आम आदमीला महागाईचा शॉक बसला आहे. EMI वाढणार असल्यानं त्यांना आता जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. RBI रेपोरेट वाढवला आहे.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा