मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते. कोकणात गावी जाणाऱ्यांची गर्दी लक्षात घेता वाहतूक कोंडीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते.
याच पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. कोकणातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
या मार्गावर अनेक ठिकाणी कामे सुरू असून रस्त्यावर खड्डेही आहेत. गणपती काळातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी हा निर्णय घेतला असून 5 सप्टेंबर ते 8 सप्टेंबरदरम्यान ही बंदी असणार आहे.