ताज्या बातम्या

Balwant Wankhade : माझी निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकतर्फी होईल

Published by : Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बळवंत वानखडे शक्तिप्रदर्शन करणार आहे.

याच पार्श्वभूमीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे की, माझा आज महाविकास आघाडीचा माध्यमातून अर्ज दाखल होणार आहे आणि महाविकास आघाडीची जी इथं शक्ती आहे ती आपल्याला इथं दिसेल. मला समर्थन देण्यासाठी लोक इथं येणार आहेत. अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक विकासाचं मुद्दे अजून प्रलंबित आहेत. पायाभूत सुविधा असतील, बेरोजगारी असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, मेळघाटचं प्रश्न असतील. हे वेगवेगळं प्रश्न मी त्या स्तरावर घेऊन मी जनतेसमोर जाईन.

प्रहारने उमेदवार उभा केला. लोकशाहीत ही प्रक्रिया आहे की, एका पेक्षा जास्त उमेदवार उभं असणं. म्हणून ते उभं राहतील. परंतु त्यांचा किंवा अन्य उमेदवाराचा माझ्यावर कुठलाही परिणाम होणार नाही. माझी निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकतर्फी होईल. ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची होईल. नवनीत राणा 3 लाखांनी हरतील. असे बळवंत वानखडे म्हणाले.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा