अमझद खान, कल्याण
कल्याण (kalyan) येथील दुर्गाडी किल्ल्यावर हिंदू व मुस्लीम या दोन्ही समाजाची धार्मिक स्थळे असून दोघांनीही आपले हक्क सांगितले आहेत.
बकरी ईद (Bakri Eid) निमित्त दोन धर्मामध्ये कोणतेही वाद होऊ नये यासाठी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सकाळी मुस्लीम बांधव नमाज पठण करत असताना पोलिसांकडून हिंदु बांधवांना सकाळी दुर्गाडी किल्ल्यावर आरती व घंटानाद करण्याकरिता प्रवेश बंदी केली जाते.
ही बंदी झुगारण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या नेतृत्वाखाली १९८६ सालापासून शिवसेनेने घंटानाद आंदोलन सुरु केले . तेव्हापासून दरवर्षी बकरी ईद निमित्त कल्याण मध्ये शिवसैनिक घंटानाद आंदोलन करतात .
यंदा राज्यात घडलेल्या राजकीय घडामोडी व शिवसेनेत निर्माण झालेले गट यामुळे आंदोलनाबाबत साशंकता होती .
आज सकाळीच शेकडो शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी कल्याण पश्चिमेकडील टिळक चौक शहर शाखेतून दुर्गडी किल्ल्याच्या दिशेने आले .पोलिसांनी त्यांना लालचौकी येथे अडवलं. शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला होता यावेळी आरती करण्यात आली. आरती नंतर पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले .याबाबत कल्याण डोंबिवली महानगर प्रमुख विजय साळवी यांनी आनंद दिघे यांनी सुरू केलेलं हे आंदोलन तीस वर्षांपासून सुरू आहे ,घटनेने हिंदूंना दिलेला दर्शनाचा अधिकार हिरावला जातोय, यावर्षी आम्हाला अपेक्षा होती.
कधीकाळी आंदोलनाचे नेतृत्व करणारे, पक्षप्रमुखांना खाली उतरवून मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्यानी हा अन्याय दूर करायला पाहिजे होता,जर खरं हिंदुत्व असतं तर मंदिर उघडायला पाहिजे होतं , त्यांचं हिंदुत्व खोटं आहे का ? हा प्रश्न आज पडलाय,असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगवला. यासोबतच ते म्हणाले की, मंदिरात आम्हाला दर्शनाला जाऊन दिलं नाही ,हे सरकार जर हिंदुत्ववादी आहे तर हा अन्याय दूर करायला पाहिजे होता अशी मागणी केली .