सुरज दाहाट/अमरावती; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (११ मे) सुनावला आहे. सुप्रीम कोर्टाने 16 आमदारांचा अपात्रतेचा मुद्दा हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. संघर्षाचा निकाल लागल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाल्या आहेत. यावर शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी लोकशाहीसोबत बोलताना 20 ते 21 तारखेला मंत्रिमंडळाचा विस्तार होईल असा दावा केला आहे.
काय म्हणाले बच्चू कडू?
आता सर्व अडथळे दूर झाले आहे त्यामुळे लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे कुणाला कराल न कराल तो नंतरचा भाग आहे. कारण एका मंत्राकडे दहा जिल्ह्याचा पदभार आहे. त्यामुळे गोंधळलेली अवस्था आहे. त्यामुळे लोकांची कामे निकाली निघावे यासाठी लवकर मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायला पाहिजे तसेच मला एकनाथ शिंदे यांनी मंत्री पद देण्याच आश्वासन दिलं होतं. एकनाथ शिंदे हे शब्दाचे पक्के आहे ते शब्द पाळणार आहे.
तर विधानसभा अध्यक्ष 16 आमदारांना अपात्र ठरवणार नाही, एकनाथ शिंदे यांनी कागदपत्री यशस्वी लढा जिंकला असेही विधान बच्चू कडू यांनी केलं तर मंत्रिमंडळ विस्तार आता खरच 20 ते 21 तारखेला होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.