Bacchu Kadu 
ताज्या बातम्या

मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर बच्चू कडू यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या भूमिकेवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता बच्चू कडू म्हणाले की, निर्णय काय घेतला चूक की बरोबर नंतरची गोष्ट आहे. निर्णय घ्यायला वेळ खूप केला. त्याच्यामध्ये कार्यकर्त्यांचे मरण झालं. बऱ्याच कार्यकर्त्यांनी पैसे नसतानासुद्धा इकडून तिकडून आणून अर्ज भरला काही खर्च करुन ठेवला. आता अगदी वेळेवर त्यांना सांगितले गेले की, मी कुणालाही पाठिंबा देणार नाही.

एका जातीवर राजकारण होऊच शकत नाही आणि एका जातीवर कुणी राजकारण करु पण नये ते लोकशाही घातक आहे. जात आणि धर्म हा फॅक्टर राजकारणात कधी आणला नाही पाहिजे. असे बच्चू कडू म्हणाले.

NEWS PLANET With Vishal Patil | 'लाडकी बहीण' ठरणार गेमचेंजर? लाडक्या बहिणींची कुणाला साथ?

Nilesh Rane | Kokan Vidhansabha | कोकणात कुणाचं वारं? निलेश राणे Exclusive

Mumbai Vidhansabha Poll | मुंबईकरांचा कौल कोणाला? 'या' नेत्यांना मिळणार पराभवाचा धक्का ?

मणिपूरमध्ये आंदोलनाला आठवडाभर स्थगिती, ‘कोकोमी’चा निर्णय

'त्या' प्रकरणी अजित पवार यांना बारामती कोर्टाचे समन्स