ताज्या बातम्या

आरोपांनंतर शांत राहिलो असतो तर बदनाम झालो असतो; उद्या भूमिका स्पष्ट करणार- बच्चू कडू

अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उडी घेत काल त्यांच्या सरकारी वर्षा या निवस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अपक्ष आमदार बच्चू कडू व आमदार रवी राणा यांच्या वादात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः उडी घेत काल त्यांच्या सरकारी वर्षा या निवस्थानी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन हे सुद्धा उपस्थित होते. रवी राणा आणि बच्चू कडू यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

आमदार रवी राणा यांनी आमदार बच्चू कडू यांच्यावर गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत. तर पैसे घेतल्याचे रवी राणा यांनी पुरावे द्यावेत अन्यथा त्यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करून असा इशारा बच्चू कडू यांनी दिला होता. यावरुन हा वाद सुरु झाला. मात्र आता शिंदे - फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणा - बच्चू कडू यांच्या वादावर पडदा पडला आहे. देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर राणा यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, माझ्याकडून कोणी दुखावले गेले असल्यास मी दिलगीरी व्यक्त करतो. मी माझे शब्द मागे घेतो. माझ्यासाठी हा विषय इथेच संपला आहे. राज्याच्या हितासाठी आम्ही हा वाद मिटवला आहे. असे राणांनी म्हटले आहे. यासोबतच बच्चू कडू आणि मी नव्या सरकारचे घटक आहोत. आम्ही दोघेही सरकारसोबत आहोत.

याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू म्हणाले की, आरोपांनंतर शांत राहिलो असतो तर बदनाम झालो असतो. माझी आज कार्यकर्त्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली आहे. आज कार्यकर्त्यांसोबत चर्चा करणार आणि उद्या यावरची माझी भूमिका मी स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय