ताज्या बातम्या

बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; वैद्यकीय चाचणीतून आरोपी धर्मराज कश्यप अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न

Published by : Siddhi Naringrekar

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या घटनेत बाबा सिद्दीकी यांचा मृत्यू झाला. तीन अज्ञात व्यक्तींनी बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या आणि यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.

यातच 15 दिवसांपूर्वीच बाबा सिद्दिकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर बाबा सिद्दिकी यांना पोलिसांकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती.

याच पार्श्वभूमीवर आता नवीन माहिती समोर येत आहे. अटक करण्यात आलेला आरोपी धर्मराज कश्यप वैद्यकीय चाचणीतून अल्पवयीन नसल्याचं निष्पन्न झालं आहे. कोर्टात धर्मराज कश्यपने तो 17 वर्षीय असल्याचा दावा केला होता.

त्यानंतर कोर्टाच्या आदेशानंतर धर्मराज कश्यपची वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यानंतर चाचणीत कश्यप अल्पवयीन नसल्याच निष्पन्न होताच रात्रीच्या वेळेस कश्यपला कोर्टात हजर करण्यात आलं. कश्यपला 21 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Shubham Lonkar: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकरला पुण्यातून अटक

Baba Siddiqui: बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण; हत्याकांड प्रकरणी मुंबई पोलिसांना मोठं यश, आणखी एकाच्या मुसक्या आवळल्या

उद्धव ठाकरे यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया, हृदयात ब्लॉकेज

'इतर राज्यातून येऊन मुंबईत केलेली दादागिरी आम्ही खपवून...' बाबा सिद्दीकी प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला संताप

Mumbai Metro: आता महामुंबई मेट्रोसाठी नवी सेवा उपलब्ध! व्हॉट्सअॅपद्वारे करता येणार बुकिंग; कशी ते जाणून घ्या...