baba siddique 10 accused arrested 
ताज्या बातम्या

Baba Siddique हत्येप्रकरणी दहाव्या आरोपीला अटक

Published by : Team Lokshahi

माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. त्यांच्या हत्येप्रकरणी आता 10 व्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. आज मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. आज गुन्हे शाखेने एका आरोपीला अटक केली आहे. हा आरोपी मूळचा राजस्थानमधील उदयपूरचा रहिवासी आहे. या आरोपीने 12 ऑक्टोबर रोजी बाबा सिद्दीकी यांची हत्या करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरवल्याचा आरोप आहे. भगवंत सिंग असं अटक करण्यात आलेल्या आरोपीच नाव आहे. तो नवी मुंबईत राहत होता. भगवंत सिंग याच्या अटकेनंतर कोठडीत असलेल्या एकूण आरोपींची संख्या 10 वर पोहोचली आहे.

बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या झाली. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. या घटनेत लॉरेन्स बिश्नोई टोळीचा सहभाग असल्याचीही माहिती समोर आली होती. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा करत असून आतापर्यंत 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावरील हल्ल्याच्या दिवसापर्यंत तो बांद्रा येथील बीकेसी परिसरातच होता. गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार,आरोपी हा कट रचणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे. भागवत सिंग ही व्यक्ती आहे ज्याने आरोपींना शस्त्रे पुरवली होती. या आरोपीला आज किल्ला कोर्टात हजर केले असता त्याला 26 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

T20 World Cup Final |न्यूझीलंडचा संघ वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विजयी

शिवसंग्रामच्या ज्योती मेटे यांचा पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Congress Meeting | कॉंग्रेसची बैठक सुरु, जागावाटप आणि ठाकरेंच्या शिवसेनेसोबतच्या वादावर चर्चा?

संतोष बांगरांना "फोन-पे" प्रकरण भोवलं!

Nilesh Rane|भाजप नेते निलेश राणे शिवसेनेत पक्षप्रवेश करणार?