ताज्या बातम्या

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न; श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

प्रभू श्रीरामाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा संपन्न झाला आहे. श्रीराम अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झालेत. आज होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह संपूर्ण देशभर रामभक्तीचे वातावरण आहे. या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली आहे.

याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, अयोध्येमध्ये श्री रामाच्या अभिषेकचा अलौकिक क्षण सर्वांनाच भावूक करणारा आहे. या दैवी कार्यक्रमाचा एक भाग होणं माझ्यासाठी खूप आनंददायी आहे. जय सिया राम.

सोहळ्याच्यावेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते. भक्तीमय वातावरणात प्रभू श्रीरामच्या जयघोषात प्राणप्रतिष्ठा संपन्न झाली. यावेळी मंदिर परिसरात विमानातून पुष्पवृष्टी करण्यात आली. तब्बल 500 वर्षांनंतर प्रभू श्रीराम विधीवत राम मंदिरात विराजमान झाले.

ऐरोलीत गणेश नाईक वि. ठाकरेंच्या शिवसेनेचे मनोहर मढवी

PM Modi Speech | 'Rahul Gandhi यांच्या तोंडातून हिंदूहृदयसम्राट वदवून दाखवा', मोदींचा टोला

NEWS PLANET With Vishal Patil |नारा एक, भूमिका अनेक; 'बटेंगे तो कटेंगे'वरून पंकजा मुंडेंचा घरचा आहेर

Rajesaheb Deshmukh Parli Assembly election 2024 : परळीत हाय व्होल्टेज सामना! राजेसाहेब देशमुख विरुद्ध धनंजय मुंडे

Dhananjay Munde Parli Assembly election 2024 : धनंजय मुंडेंसमोर मराठा उमेदवाराचे आव्हान