राज्यात राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या नऊ आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेऊन शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली आहे. असे असले तरी अजित पवारांना किती आमदारांचा पाठिंबा आहे हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. अनेक बड्या नेत्यांची नावे अजित पवारांसोबत चर्चिले जात आहेत. यात अमोल कोल्हे यांचेही नाव होत. पण आता त्यांनी मी साहेबांसोबत असं म्हणत ट्विट केलं आहे. त्यावर आता जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे.
जितेद्र आव्हाडांचे ट्विट
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे की पहिला मोहरा परत आला आहे.
दरम्यान, राजकीय भूकंपानंतर शरद पवार आज प्रथमच सातारा जिल्ह्यात दाखल झाले आहेत. यावेळी आता शरद पवारांसोबत आमदार मकरंद पाटील, शशिकांत शिंदे आणि जुन्नरचे आमदार अतुल बेनके हे उपस्थित होते. हे तीनही आमदार काल अजित पवारांसोबत शपथविधीला उपस्थित होते. यामुळे दोन दिवसांत आमदार परतणार हा शरद पवारांचा दावा खरा ठरताना दिसत आहे.