ताज्या बातम्या

उपनगरीय रेल्वे अपघातांत दिवसाला सरासरी एवढे मृत्यू

यात अनेक प्रवासी लोकल दरवाजाला लटकून प्रवास करतात. परिणामी, धावत्या लोकलमधून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसणे अशा घटना घडतात.

Published by : Team Lokshahi

नोकरदार वर्ग कार्यालयात वेळेत पोहचण्यासाठी सकाळच्या वेळी प्रचंड घाईत असतो. तर सायंकाळी परतीच्या प्रवाशांचा भार वाढल्याने लोकलला प्रचंड गर्दी असते. यात अनेक प्रवासी लोकल दरवाजाला लटकून प्रवास करतात. परिणामी, धावत्या लोकलमधून पडणे, बाहेरील खांबाचा जोरदार फटका बसणे अशा घटना घडतात. यामध्ये 2023 मध्ये वेगवेगळ्या रेल्वे अपघातांत 2590 प्रवाशांचा मृत्यू झाला आणि 2441 प्रवासी जखमी झाले आहेत.

2023 वर्षात सर्वाधिक मृत्यू हे रेल्वे रूळ ओलांडताना झाले आहेत. या वर्षात 1277 प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये 1168 पुरुष आणि 109 महिला प्रवासी होते. तर, मध्य रेल्वेवर मार्गावर 728 आणि पश्चिम रेल्वे मार्गावर 495 प्रवाशांचा मृत्यू रेल्वे रूळ ओलांडताना झाला आहे. या घटनेत एकूण 241 प्रवासी जखमी झाले असून यात मध्य रेल्वेवरून 148 आणि पश्चिम रेल्वेवरून 93 प्रवासी जखमी झालेत, अशी माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.

दरम्यान, लोकलमधील गर्दीचा भार प्रचंड वाढला असून, दरवाजावर लटकून धोकादायक प्रवास प्रवाशांकडून केला जातो. गर्दीचा लोंढा दरवाजावरील प्रवाशाला बाहेर ढकलून दिल्याने अनेक प्रवासी धावत्या लोकलमधून पडतात. 2023 वर्षात सर्वाधिक जखमी या घटनेत झाले आहेत. मध्य रेल्वेवरून 752 आणि पश्चिम रेल्वेवरून 489 असे एकूण 1241 प्रवासी जखमी झाले. तर, एकूण 590 प्रवाशांचा मृत्यू झाला असून यात मध्य रेल्वेवर 431 आणि पश्चिम रेल्वेवर 159 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news