उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी रविवारी 15 सप्टेंबर रोजी मध्य रेल्वेने मेगाब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे गणेशोत्सवाचा शेवटचा रविवार असल्याने गिरणगावातील सार्वजनिक गणपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे हाल होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वे
कुठे: विद्याविहार ते ठाणे पाचव्या सहाव्या मार्गिकेवर
कधी: सकाळी 8:00 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत
परिणाम: ब्लॉक कालावधीत लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटणाऱ्या / येणाऱ्या डाऊन आणि अप मेल / एक्स्प्रेस विद्याविहार स्थानकावर अनुक्रमे डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे स्थानकावर अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
कुठे: सीएसएमटी -चुनाभट्टी/वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर
कधी: सकाळी 11:10 ते दुपारी 4:10 वाजेपर्यंत
परिणाम: ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशी / बेलापूर / पनवेल अप आणि डाऊन मार्ग, सीएसएमटी ते वांद्रे / गोरेगाव अप आणि डाऊन मार्ग बंद असेल. ब्लॉक कालावधीत कुर्ला – पनवेल दरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी 10:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत मुख्य मार्ग आणि पश्चिम रेल्वेमार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे.