ताज्या बातम्या

पश्चिम बंगालमध्ये आणखी एक धक्कादायक घटना, सीटीस्कॅन केंद्रात अल्पवयीन तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशातील वातावरण शांत झालेलं नसताना पश्चिम बंगालमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Published by : shweta walge

कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणी देशातील वातावरण शांत झालेलं नसताना पश्चिम बंगालमधून आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हावडा येथील एका रुग्णालयातील कर्मचाऱ्याने रुग्णालयात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. सीटीस्कॅन केंद्रात कोणी नसल्याचा गैरफायदा घेत त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अल्पवयीन मुलीच्या पालकांनी गुन्हा दाखल केला आहे.

गेल्या 28 ऑगस्टला एका 12 वर्षांच्या मुलीला छातीत दुखत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पीडितेला शनिवारी (31 ऑगस्ट) सीटी-स्कॅन साठी घेऊन जात असताना एका टेक्निशियनने तिच्यासोबत गैरवर्तन केले. प्रकरणाची माहिती मिळताच हावडा पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान पोलिसांनी एका आरोपीला अटकही केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे