ताज्या बातम्या

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील कोल्हे यांच्यावर प्राणघातक हल्ला, गंभीर जखमी. हल्लेखोरांना कठोर शिक्षा देण्याची मागणी.

Published by : shweta walge

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा, येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर काल संध्याकाळी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे.तालखेड आणि तालखेड फाट्याच्यामध्ये हा हल्ला झाला. हल्लेखोर तोंडावर रूमाल बांधून होते. दोन वेगवेगळ्या बाईकवरून आलेल्या चार जणांनी रॉडने कोल्हे यांच्यावर हल्ला चढविला. यात सुनील कोल्हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला असल्याची माहिती आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भर्ती करण्यात आले आहे.

माहितीनुसार, सुनील कोल्हे यांचा डावा पाय आणि डावा हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांना जिल्हा सामान्य रुग्ण्यालयात भर्ती करण्यात आले आहे. बुलढाणा महाविकास आघाडीच्या पराभूत उमेदवार अॅड जयश्री शेळके रुग्णालयात दाखल झाल्या असून हल्लेखोरांवर कडक कारवाईची मागणी अॅड. जयश्री शेळके यांनी केली आहे. निवडणुकीत महाविकास आघाडीचे ज्यांनी प्राणपणाने काम केले अशा लोकांवर प्राण घातक हल्ले केले जात असून निकाल लागल्याच्या दिवसापासून महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या घरावर तलवारी घेऊन चाल करणे, ज्यांच्या घरावर बॅनर होते त्यांना मारहाण करणे तसेच धमकावण्याचे प्रकार सुरु असल्याचे जयश्री शेळके यांनी आरोप केले आहेत.

जिल्हा पोलीस प्रशासनाने अशा हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. बुलढाण्याचा बिहार करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून सुरू असून जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान कोल्हे यांना भेटण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्ण्यालयाकडे धाव घेतली आहे.

दरम्यान कोल्हे यांना पाहण्यासाठी अनेकांनी जिल्हा रुग्ण्यालयाकडे धाव घेतली होती. शिवसेना ठाकरे गट नेत्या जयश्री शेळके यांनी या प्रकरणी आरोपीवर कारवाईची मागणी केली आहे.

Gulkand Benefits : गुलाबाच्या पाकण्यांपासून तयार झालेला गुलकंद आरोग्यासाठी इतका फायदेशीर! कसा ते जाणून घ्या...

नरेश अरोरा यांचा Ajit Pawar यांच्या खांद्यावर हात, Amol Mitkari भडकले; थेट म्हणाले...

Ramdas Athawale on Eknath Shinde: ...तर एकनाथ शिंदेंना दिल्लीला बोलवा, रामदास आठवलेंची मागणी काय?

SC Rejects Petition against EVM | हारलं की EVMमध्ये छेडछाड दिसते-SC, Arvind Sawant यांची प्रतिक्रिया

Aaditya Thackeray : 'महायुतीचा मुख्यमंत्री नक्की कोण होतोय?'आदित्य ठाकरेंचा महायुतीला सवाल