ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भास्कर खुरसंगे यांच्या घरावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या मागाठाण्यातल्या घरावर हा हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात त्यांची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. त्यामुळे आता मागाठाण्यात हल्ल्यांचं प्रमाण वाढले असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. हल्ला नेमका का करण्यात आला असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
या पार्श्वभूमीवर भास्कर खुरसंगे यांनी लोकशाही मराठी न्यूजसोबत संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, रात्री 3 वाजता माझ्या घराच्या मागच्या बाजूला दोन आलेल्या दोन हल्लेखोरांनी पहिला सीसीटीव्ही कॅमेरा फोडला. मागच्या बाजूने त्यांनी दुसऱ्या माळ्यावर प्रवेश केला. त्यांनी घरात घुसून मुलीला मारायला सुरुवात केली. त्यांनी तिच्यावर वार केलेले आहेत. हातावर, मांडीवर , पोटरीवर त्यांनी वार केले आहेत. त्यानंतर ते दुसऱ्या माळ्यावरुन पळून जाण्यात यशस्वी झाले.
आमचा कधी कुणाची वादविवाद नव्हता. सध्या जे काही राजकारणा सुरु आहे. याआधी वाढदिवसाच्या दिवशीसुद्धा माझे बॅनर फाडले होते. त्यामुळे आता हा हल्ला राजकीय वैमनस्यातून झालेला आहे असेच बोलू शकतो. एफआयआर दाखल केलेली आहे. पोलिसांनी सीसीटिव्ही फुटेज मिळवलेले आहेत आणि तपास सुरु आहे. असे खुरसंगे यांनी सांगितले.