ताज्या बातम्या

Ashish Shelar : सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय... ? महाराष्ट्र पाहतोय!!

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले.

Published by : Siddhi Naringrekar

विधानपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून या निवडणुकीत महायुतीचे सर्व उमेदवार विजयी झाले. महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 7 मतं फुटली आहेत. याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया दिली आहे.

याच पार्श्वभूमीवर आता आशिष शेलार यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. आशिष शेलार म्हणाले की, विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी ! सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!

महाराष्ट्र पाहतोय...

◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही.

◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला.

( गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती)

यासोबतच ते पुढे म्हणाले की, ◆ तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला.

◆ सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय... ? महाराष्ट्र पाहतोय!! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात ! असे आशिष शेलार म्हणाले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी