Sanjay Raut, Ashish Shelar Team Lokshahi
ताज्या बातम्या

सिनेमात जॉनी लिव्हर यांच्या एवढाच संजय राऊतांचा रोल- आशिष शेलार

मुंबईत नाल्यांची सफाई लवकर होत नसल्याने आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून निविद काढण्याची मागणी केली आहे.

Published by : shweta walge

मुंबईत नाल्यांची सफाई लवकर होत नसल्याने आमदार आशिष शेलार यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहून निविद काढण्याची मागणी केली आहे. मुंबईतील मोठ्या नाल्यांच्या साफसफाईच्या कामाच्या निविदा अद्याप काढण्यात न आल्याने गतवर्षी प्रमाणेच कामांना विलंब होणार का? असा सवाल आशिष शेलार यांनी केला आहे. तसेच संजय राऊत हे सामना कार्यालयात संविधान लिहीत असतील यामुळे ते काहीही बरळत असतात असा टोला देखील शेलारांनी संजय राऊतांना दिला आहे.

आशिष शेलार म्हणाले की. मुंबईत 309 च्या वर मोठे नाले आहेत तर 508 छोटे नाले आहेत. याचबरोबर 5 नद्या आहेत. परंतु यांच्या साफसाईच्या निविद वेळेत निघाल्या नाहीत तर सफाईच्या कामाला उशीर होतो. ही दिरंगाई मुंबई करांच्या जिवाशी बेतते त्यामुळे एक स्पेशल टीम लावा असे पत्र मी आयुक्तांना लिहिले असल्याची माहिती शेलारांनी दिली आहे. मुंबईतील प्रत्येक भागाचे सुशोभिकरण झाले पाहिजे हे आमचे मत आहे. मागच्या 25 वर्षात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला वेळ मिळाला नाही. संपूर्ण मुंबईला पुतना मावशीचे प्रेम आहे का? आम्ही मुंबईकरांचे सेवक आहोत त्यामुळे काम करून घेणे ही आमची जबाबदारी आहे. नाल्यावर आम्ही करडी नजर ठेवू असेही ते यावेळेस म्हणाले आहेत.

राऊतांवर टीका करत म्हणाले की,

संजयर राऊत हे सामना कार्यालयात संविधान लिहीत असतील यामुळे ते काहीही बरळत असतात. तसेच मीडियासमोर येऊन रोज पुड्या सोडणे आणि टीव्हीवर प्रेस घेणे हे संजय राऊत यांचे काम आहे. सिनेमातील जॉनी लिव्हर यांच्या एवढा रोल संजय राऊत यांचा आहे. जॉनी लिव्हर यांच्याबद्दल मला प्रेम आणि आदर आहे. पण त्यांच्या सिनेमातील रोल एवढाच संजय राऊत यांचा रोल आहे. अशा शब्दात शेलार यांनी संजय राऊत यांचा समाचार घेतला.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...