Ashadhi Ekadashi Puja Team Lokshahi
ताज्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2022 : राज्यातील प्रत्येकाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाकडे साकडे

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ). याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची ही महापूजा करण्यात आली.

Published by : Siddhi Naringrekar

आज आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi ). याच निमित्ताने दरवर्षीप्रमाणे या वर्षी पंढरपुरात विठुरायाची महापूजा पार पडली. महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्या पत्नी लता यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची (Vitthal-Rakhumai) ही महापूजा करण्यात आली.

मुख्यमंत्री पदभार स्विकारल्यानंतर एकनाथ शिंदे (eknath shinde ) यांच्या हस्ते ही पहिलीच महापूजा पार पडली आहे. पहाटे 3 वाजून 10 मिनिटांनी ही शासकीय महापूजा पार पडली आहे.

याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिदेंनी (eknath shinde )सांगितले की, "मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपुरातील विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात होणाऱ्या शासकीय पूजेचा मान मिळाला. पांडुरंगाला सर्वकाही माहित असतं. आज पाऊस सुरू आहे, माझ्या राज्यातील बळीराजा सुखावला पाहिजे. कुठेही पूर परिस्थिती, अतिवृष्टीची दुर्घटना घडू नये. एवढेच नव्हे तर राज्यातील प्रत्येक जाती धर्मातील लोकांसोबत बळीराजाच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ दे हेच साकडे मी विठ्ठलाकडे घातले,"

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) यांच्यासोबत बीड (beed) जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील रुई गावच्या मुरली बबन नवले आणि त्यांच्या पत्नी जिजाबाई मुरली नवले या शेतकरी दाम्पत्याला विठुरायाच्या शासकीय महापूजेचा मान मिळाला आहे. गेली 20 वर्ष शेती करून आपल्या कुटुंबाला सांभाळणाऱ्या नवले कुटुंबात 1987पासून वारीची परंपरा सुरु आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result