Asaduddin Owaisi - Nagraju Murder Case Team Lokshahi
ताज्या बातम्या

अल्लाह से डरो...हैदराबादच्या नागराजु हत्या प्रकरणावर ओवैसींनी सोडलं मौन

Nagraju Murder Case : मुस्लीम मुलीशी लग्न केल्यानंतर तरुणाची हत्या करण्यात आली.

Published by : Sudhir Kakde

Nagraju Murder Case: नागराजू हत्येवरून हैदराबादमध्ये (Hyderabad) खळबळ उडाली आहे. या घटनेची सोशल मीडियावरही मोठी चर्चा सुरू आहे. हैदराबादमध्ये एका मुस्लीम तरुणीने आपल्या कुटुंबाच्या विरोधात जाऊन हिंदू तरुणाशी लग्न केल्याने 4 मे रोजी तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी याप्रकरणी मौन सोडलं आहे. हैदराबादचे खासदार ओवैसी यांनी या घटनेला इस्लामविरोधी म्हटलं आहे. ओवेसी म्हणाले, मुस्लिम मुलीने तिच्या ईच्छेने लग्न केलं आहे. कायदेशीररित्या तिला हा निर्णय घेण्याची परवानगी आहे. (Asaduddin Owaisi Reaction on Nagraju Murder Case)

'आवडीनुसार लग्न करण्याची कायद्याने परवानगी'
हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवैसी म्हणाले, मुस्लिमांमध्ये दोन मुस्लिम स्त्री आणि पुरुषांमध्ये मध्ये विवाह होता. तो शरियत कायदा आहे. हिंदू विवाह कायद्यानुसार दोन हिंदूंमध्ये विवाह होतो. त्यात विशेष विवाह कायद्याचीही तरतूदही आहे. मात्र हैदराबादमध्ये या मुलीने तिच्या ईच्छेने लग्न केलं, तिला तशी कायदेशीर परवानगी आहे. त्यामुळे मुलीच्या नवऱ्याला जाऊन मारण्याचा अधिकार मुलीच्या भावाला नाही. कायद्याने तो गुन्हा आहे. इस्लाममधील सर्वात वाईट गुन्हा म्हणजे खून आहे असंही ओवैसी म्हणाले.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय