राज्यात एमबीबीएसच्या तब्बल 600 जागा वाढणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यात 6 ठिकाणी मेडिकल कॉलेजसाठी मान्यता मिळाली आहे. ठाणे, अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालन्यात प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेच्या मेडिकल कॉलेजला मान्यता देण्यात आली आहे.
प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने सोमवारी परवानगी दिली असल्याची माहिती मिळत असून राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने याविषयी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे अर्ज केला होता.
प्रत्येकी 100 विद्यार्थी क्षमतेचे 6 मेडिकल कॉलेज सुरू होणार असून अंबरनाथमध्येही आता मेडिकल कॉलेज सुरु होणार आहे.
याच पार्श्वभूमीवर आता अमरावती, हिंगोली, वाशिम, गडचिरोली आणि जालना येथे प्रत्येकी १०० विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या शिक्षण विभागाने परवानगी दिली आहे.