गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. सर्वजण गणेशाच्या आगमनासाठी उत्सुक आहेत. जोरदार तयारी सुरु झाली आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूर्ती मंडपाकडे रवाना होत आहेत. या बाप्पांच्या मूर्त्या ढोल - ताशाच्या गजरात मंडपाकडे रवाना होत असतात. मुंबईत 12 हजारांवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं तर 1 लाख 90 हजार ठिकाणी घरगुती गणेशोत्सव साजरा केला जातो.
यात आता गणेश आगमन मार्गावरील तब्बल 13 पूल धोकादायक असल्याची माहिती मिळत आहे. या पुलावरून जाताना काळजी घ्यावी, जास्त वेळ थांबू नये असा इशारा पालिकेच्या पूल विभागाकडून देण्यात आला आहे.
प्रभादेवी- कॅरोल रेल ओव्हर ब्रीज
दादर-टिळक रेल्वे ओव्हर ब्रीज
करीरोड रेल्वे ओव्हर ब्रीज
महालक्ष्मी स्टील रेल्वे ओव्हर ब्रीज
मरीन लाईन्स रेल्वे ओव्हर ब्रीज
सँडहर्स्ट रोड रेल्वे ओव्हर ब्रीज
घाटकोपर रेल्वे ओव्हर ब्रीज
फॉकलँड रेल्वे ओव्हर ब्रीज
बेलासीस मुंबई सेंट्रलजवळील ब्रीज
केनडी रेल्वे पूल
फ्रेंच रेल ओव्हर ब्रीज