Mumbai Police : मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलने मोठी कारवाई केली आहे. अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटने जवळपास ५० किलोपेक्षा जास्त एमडी ड्रग्ज जप्त केलं आहे. अँटी नार्कोटिक्स सेल वरळी युनिटनेही मोठी कारवाई केली आहे. 5 तस्करांनाही अँटी नार्कोटिक्स सेलनं अटक केली आहे. (Anti Narcotics Cell of Mumbai Police)
एनसीबीने 1 जूनपासून अमली पदार्थ निर्मूलन मोहीम सुरू केली होती आणि 29 जुलैपर्यंत 11 राज्यांमध्ये 51,217 किलोपेक्षा जास्त अमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन केल्यावर, NCB ने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्त 75,000 किलो ड्रग्ज नष्ट करण्याची शपथ घेतली आहे. अशातच आता मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी सेलनेही ही मोठी कारवाई करत 50 किलोहून अधिक एमडी ड्रग्ज जप्त केले आहेत.