शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानामध्ये देणगी देणाऱ्या भाविकांची संख्या ही प्रचंड मोठी आहे. शिर्डीचे साईबाबा मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे! 2,000 कोटी रुपयांच्या संपत्तीसह, शिर्डीचे साईबाबा मंदिर भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. अलिकडील काळात साईंच्या चरणी भलीमोठी देणगी अर्पण करणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. नुकतंच हैद्राबादच्या एका भक्तांने साईंच्या चरणी सोनं अर्पण केलंय.
जगभरात सोन्याच्या किंमतीत कमालीची वाढ झाली असली तरी साईबाबांच्या दरबारात सोने चढवण्याचू जणू स्पर्धाच लागली आहे. हैद्राबाद येथील साईभक्त एम.राजेंद्र रेड्डी या भाविकाने तीन सोन्याची कमळाची फुलं अर्पण केली आहेत. या फुलांची किंमत तब्बल 10 लाख रुपये इतकी आहे. अतिशय सुंदर कारागिरी केलेल्या या सोन्याच्या कमळ फुलांना रेड्डी या भाविकाने साई संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्याकडे सुपूर्त केली आहेत. काल मध्यान्ह आरती दरम्यान बाबांच्या वस्रावर यातील सर्वात मोठे सुवर्ण कमळ फुल लावण्यात आलेय.