ताज्या बातम्या

दापोली नगरपंचायतीतील ठाकरे गटाचा आणखी एक नगरसेवक अडचणीत

Published by : Sagar Pradhan

निसार शेख|प्रतिनिधी|रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीचे नगरसेवक अजिम चिपळूणकर यांनी दापोलीतील गिम्हवणे या दोन ठिकाणी गेल्या १० वर्षापासून सातत्याने मतदान केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते वसिम मुकादम यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे ठाकरे गटातील आणखी एक नगरसेवक चौकशी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे दापोलीच्या राजकरणात खळबळ उडाली आहे

दापोली तालुक्यातील मौजे गिम्हवणे येथील सहकारनगर येथे चिपळूणकर यांनी कमीत कमी १० वर्षे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केलेले आहे, तसेच चिपळूणकर हे दापोली नगर पंचायत हद्दीत फॅमिली माळ येथे देखील मतदार आहेत. त्यांनी दापोली नगर पंचायतीची निवडणूक देखील लढवली असून ते आता नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. यामुळे या दोन्ही व्यक्ती एकच असल्याचे आधारकार्ड क्रमांकावरून सिध्द होत आहे. यामुळे भारतीय लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम १८ व कलम ३१ अन्वये त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी मुकादम यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. यापूर्वीच नगर पंचायतीच्या ११ नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यामध्ये अजीम चिपळूणकर यांची भर पडल्याने कारवाईची टांगती तलवार असलेल्या नगरसेवकांची संख्या आता १२ वर जाऊन पोहोचली आहे. आता जिल्हाधिकारी या नगरसेवकांवर काय कारवाई करतात की पूर्ण नगर पंचायतच बरखास्त करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा