ताज्या बातम्या

'२०२४ला भाजपचाच मुख्यमंत्री होणार' बावनकुळेंनंतर भाजपच्या आणखी एका नेत्याचा दावा

2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

Published by : shweta walge

2024 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असं भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानाची सर्वत्र चर्चा होत असताना यावर भाजपचे उपाध्यक्ष माजी खासदार संजय काकडे यांनी 2024ला भाजपचाच मुख्यमंत्री होणार असल्याचं वक्तव्य केलंय.

ते म्हणाले की, २०२४ ला भाजपचाच मुख्यमंत्री होणार. तीन राज्यात झालेला विजय हा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचाच आहे. अजित पवार यांच्या सगळ्या मागण्या आम्ही पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे आगामी काळात आमचाच मुख्यमंत्री असणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

मनोज जरागे आणि भुजबळ यांनी हातात माईक न घेता मंत्रालयात जावं. मराठा आणि ओबीसी वादाचा फटका निवडणुकीत भाजपला बसणार नाही. दोन समाजात तेढ निर्माण होईल असे दोघांनाही बोलू नये.

बारामती लढायची का नाही याचा विचार केंद्रीय पातळीवर होईल.अजित पवारांनी बारामती लढणार असल्याचं घोषित केलं म्हणजे काही तरी ठरल असेलच.

लोकसभा आम्ही महायुती म्हणून लढणार पणं विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लोकसभा निकालानंतर ठरवणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण