आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण तापलं असताना वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठी घोषणा केली आहे. येत्या२५ जुलैपासूनराज्यात आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. तसच सरकारकडे सहा प्रमुख मागण्या देखील केल्या आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
ओबीसींचं आरक्षण वाचलं पाहिजे.
एससी एसटी विद्यार्थ्यांची स्कॉलरशीप डबल करावी.
ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाही एससी एसटीची स्कॉलरशीप लागू करा.
घाईगडबडीत फॉर्म ऑफ कास्ट सर्टिफिकेट तो घाईगडबडीत दिला आहे. तो रद्द करावा, जे कुणबी आहेत त्यांना आरक्षण मिळणारच.
शेवटी आरक्षण जे आहे, त्यात एससी एसटीला पदोन्नती तसेच ओबीसींनाही पदोन्नती मिळाली पाहिजे.
नव्याने दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करा.