राज्यात सध्या नवे शिंदे- फडणवीस सरकार स्थापन होऊन बरेच दिवस झाले आहे. अशातच या सरकारने नुकताच 75 हजार सरकारी नोकरीची बंपर भरती काढली आहे. याच पार्श्वभूमीवर सरकारने आरोग्य विभागातील भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे. आरोग्य विभागात तब्बल 10 हजार 27 जागांची पदभरती केली जाणार आहे. यामध्ये विविध पदांचा समावेश असणार आहे. या भरतीबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.
या पदांसाठी भरती
या भरतीची जाहीरात 1-7 जानेवारी 2023 दरम्यान प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर 26-27 मार्च 2023 ला परीक्षा होणार आहे. आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, पर्यवेक्षक या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे.
अश्या आहेत सर्व तारखा
1 ते 7 जानेवारी दरम्यान आरोग्य विभागाची भरतीची जाहीरात निघणार आहे. 25 ते 30 जानेवारी अर्ज करता येतील. 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान अर्जाची छाननी तर 25 आणि 26 मार्च रोजी परीक्षा होईल. तसेच एकाच दिवशी राज्यभरात ही परीक्षा होईल.
पूर्वी फॉर्म भरलेल्यांना पैसे परत मिळणार
मार्च 2019 मध्ये अर्ज भरलेल्या ज्या विद्यार्थ्यांचे वय निघून गेले आहे, त्यांना या परीक्षेत सूट देण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पूर्वी अर्ज केले होते. एकाच उमेदवाराने अनेक ठिकाणी अर्ज केले होते. यंदा तसे करता येणार नाही. एका वेळी एकच अर्ज करता येणार आहे. तसेच पूर्वी फॉर्म भरलेल्यांना पैसे परत मिळणार आहे.